मिरज : स्वीकृत नगरसेवक पदासाठी हालचाली वेगाने सुरू असताना बाळासाहेब श्रीहरी अस्वले यांना संधी द्यावी, अशी मागणी काही नागरिकांकडून पुढे येत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या अस्वले यांनी नागरिकांच्या विविध प्रश्नांवर काम केल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. विशेषतः संकटसमयी मदत आणि सामान्य नागरिकांशी थेट संपर्क यामुळे नागरिकांकडून त्यांना संधी देण्यात यावी अशी चर्चा सुरु आहे.
दरम्यान, भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी सेलचे अध्यक्ष म्हणून काम पाहत असताना संघटन मजबूत करण्याबरोबरच त्यांनी वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, स्वीकृत नगरसेवक पदासाठी इतरही काही नावे चर्चेत असल्याने अंतिम निर्णय कोणाच्या बाजूने होणार याकडे आता मिरजकरांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: सांगली जिल्ह्यात ३० मार्चपर्यंत जमावबंदी; ५ पेक्षा जास्त जणांना एकत्र येण्यास मनाई.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










