सांगली : जिल्ह्यात जनगणना 2027 साठी प्रशासनाने तयारी सुरू केली असून आता 5 हजारांहून अधिक कर्मचारी घराघरात जाऊन माहिती गोळा करणार आहेत. यावेळी जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार असल्यामुळे नागरिकांनी योग्य माहिती देणे महत्त्वाचे ठरणार आहे.
या जनगणनेसाठी जिल्ह्यात सुमारे 5124 प्रगणक व पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत. हे कर्मचारी शहरी आणि ग्रामीण भागात प्रत्यक्ष भेट देऊन घरांची माहिती नोंदवतील.
जनगणना दोन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात 16 मे ते 14 जून 2026 दरम्यान घरगणना केली जाईल. या वेळी प्रगणक घरातील व्यक्तींना सुमारे 34 प्रश्न विचारून माहिती मोबाईल ॲपद्वारे अपलोड करतील.
यापूर्वी नागरिकांना 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत स्वतःची माहिती ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात फेब्रुवारी 2027 मध्ये प्रत्यक्ष जनगणना केली जाईल.
प्रशासनाकडून यासाठी प्रशिक्षणही पूर्ण करण्यात आले असून डिजिटल पद्धतीमुळे प्रक्रिया अधिक जलद आणि अचूक होणार आहे.
हेही वाचा: सांगलीत सुरक्षा वाढणार? पोलिसांसाठी कोट्यवधींची कामे मंजूर.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










