सांगली : संजयनगर परिसरात कोयता बाळगून फिरणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई बुधवारी रात्री उशिरा खेराडकर पेट्रोल पंपाजवळ करण्यात आली.
पोलीस पथक पेट्रोलिंग करत असताना पथकाला बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक तरुण कमरेला शस्त्र लावून खेराडकर पेट्रोल पंपाजवळ रोडच्या कडेला उभा आहे. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
संशयावरून संबंधित तरुणाला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक कोयता जप्त करण्यात आला.
ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव नवाज शफिक शेख (वय 19, रा. चैतन्यनगर, संजयनगर, सांगली) असे आहे.
या प्रकरणी त्याच्याविरुद्ध बंदी आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा: विट्यात कोयता घेऊन दहशतीचा प्रयत्न; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल.
- सांगलीत कंबरेला कोयता लावून फिरणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात; गुन्हा दाखल
- विट्यात कोयता घेऊन दहशतीचा प्रयत्न; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
- वाळवा तालुक्यात भीषण अपघात; उभ्या ट्रकला मागून आलेल्या ट्रकची जोरदार धडक, चालकाचा मृत्यू
- सांगलीत पुढील 3 तासांत पावसाची शक्यता; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
- सांगलीत जनगणना 2027 ची तयारी सुरू; 5 हजार कर्मचारी घराघरात जाऊन माहिती गोळा करणार
- सांगलीत सुरक्षा वाढणार? पोलिसांसाठी कोट्यवधींची कामे मंजूर









