सांगली : वाढत्या महागाईमुळे विवाहाचा खर्च कमी करण्यासाठी सांगली जिल्ह्यात राज्य शासनाची ‘कन्यादान योजना’ राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून सामूहिक विवाह करणाऱ्या मागासवर्गीय कुटुंबांना आर्थिक मदत दिली जाते.
कन्यादान योजनेअंतर्गत सामूहिक विवाह करणाऱ्या पात्र जोडप्यांना 20 हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाते. ही रक्कम वधूच्या पालकांच्या नावाने धनादेशाद्वारे दिली जाते.
तसेच सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या संस्था किंवा संघटनांना प्रत्येक जोडप्यामागे 4 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. संस्थानी या योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान 10 जोडप्यांचा सामूहिक विवाह करणे आवश्यक आहे.
अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल मागासवर्गीय कुटुंबांसाठी ही योजना लागू आहे. त्यामुळे कमी खर्चात विवाह करण्यासाठी सांगली जिल्यातील पात्र नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सांगली यांचेकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा: सांगलीच्या ७ महिलांनी मिळवला दिल्लीत सन्मान; राष्ट्रीय मंचावर झळकली कामगिरी.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










