सांगली : शहरातील गावभाग परिसरात स्वयंपाकघर झाडण्यावरून सासू आणि सुनेत झालेल्या वादाचे हाणामारीत रूपांतर झाल्याची घटना घडली आहे. या प्रकारात दोघीही जखमी झाल्या असून परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
ही घटना गुरुवारी (दि. 19) सकाळी घडली. शांताबाई लक्ष्मणराव फलटणकर (वय 76) आणि त्यांची सून वर्षा विनायक फलटणकर (वय 48, दोघी रा. गावभाग, सांगली) यांच्यात स्वयंपाकघर झाडण्याच्या कारणावरून वाद झाला.
वाद वाढल्याने दोघींमध्ये मारहाण झाली. यामध्ये शांताबाई यांच्या हाताला दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.
दरम्यान, सुनेनेही सासूकडून मारहाण झाल्याची तक्रार केली असून या प्रकरणी पोलिसांत परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हेही वाचा: सांगलीत विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी; परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, खर्च सरकार करणार.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










