सांगली : संसदेत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी गॅस वितरणाच्या समस्येकडे लक्ष वेधले आहे.
Finance Bill 2026 वर बोलताना ते म्हणाले की, या विधेयकातून सामान्य नागरिकांच्या अडचणी कमी करण्यासाठी ठोस उपाय दिसत नाहीत. सरकारची धोरणे वरकरणी सकारात्मक वाटत असली तरी प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असल्याचे ते म्हणाले.
गॅस वितरणाबाबत बोलताना त्यांनी ग्रामीण भागातील परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले. काही ठिकाणी नागरिकांना गॅस सिलेंडरसाठी तब्बल 45 दिवस प्रतीक्षा करावी लागत असून शहरांमध्येही 25 दिवसांची मर्यादा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामीण भागात मोठी कुटुंबे एकाच सिलेंडरवर अवलंबून असल्याने अडचणी वाढत असल्याचे ते म्हणाले. तसेच, गॅस उपलब्धतेवरील निर्बंधांमुळे काही ठिकाणी पुन्हा पारंपरिक इंधनाकडे वळण्याची वेळ येत असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा: ईश्वरपूर-सांगली रोडवर अपघात; दुचाकीस्वार दाम्पत्य जखमी, वॅगनआर चालक फरार.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










