Sangli Weather Alert | सांगली : भारतीय हवामान विभागाने (IMD) शनिवार, दि. २० सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील २० जिल्ह्यांना यलो अलर्ट (Yellow Alert) दिला आहे. यात सांगली जिल्ह्याचाही समावेश असून या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून वीजांसह वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, तेलंगणा–विदर्भ सीमारेषेवर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम म्हणून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांत मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवली आहे.
सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्र
पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे. या भागात ढगांचा गडगडाट, वीजा आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवला आहे. शेतकरी व नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मराठवाडा आणि विदर्भ
हिंगोली व नांदेड वगळता उर्वरित मराठवाडा जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट आहे. तर नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीसह पूर्व विदर्भातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
पुढील चार दिवस पाऊस
हवामान विभागानुसार, पुढील किमान चार दिवस राज्यातील पावसाचे प्रमाण कायम राहणार असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात मुसळधार पावसाचे सत्र अधिक तीव्र असेल.
हेही वाचा: पडळकरांच्या वक्तव्यावर वाळव्यात संतापाचा लोट; इस्लामपुरात निषेध मोर्चा.