सांगली : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला असून फेब्रुवारीअखेरीस बहुतांश कारखाने बंद होण्याची शक्यता आहे. हंगाम कमी दिवसांत आटोपत असल्याने उर्वरित उसाचे नियोजन आणि थकबाकीवर शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांनी १२ फेब्रुवारीपर्यंत एकूण ७६ लाख ६ हजार ४५४ टन ऊस गाळप करून ८० लाख २७ हजार ८४७ क्विंटल साखर उत्पादन केले आहे. १०.४८ टक्के सरासरी साखर उतारा नोंदवला गेला आहे.
उताऱ्यात राजारामबापू पाटील यांचे वाटेगाव युनिट १२.५३ टक्क्यांसह आघाडीवर आहे, तर ऊस गाळपाच्या प्रमाणात सोनहिरा साखर कारखाना (सुमारे ९.३९ लाख टन) पुढे आहे.
काही कारखान्यांनी बंद करण्याच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. वाटेगाव युनिट ८ फेब्रुवारीला बंद झाले असून, साखराळे, कारंदवाडी आणि जत युनिट १७ फेब्रुवारीपर्यंत गाळप थांबवणार असल्याची माहिती आहे. ‘क्रांती’ कुंडल १६ फेब्रुवारीला, तर सोनहिरा कारखाना २० फेब्रुवारीच्या आसपास गाळप पूर्ण करणार आहे.
यंदा अनेक कारखान्यांचा हंगाम १०२ ते १११ दिवसांत आटोपला आहे. पूर्वी १५० दिवस चालणारा गाळप हंगाम गेल्या काही वर्षांत १२० दिवसांवर आला आहे. यंदा त्यापेक्षाही कमी कालावधीत गाळप संपत असल्याने पुढील वर्षी हंगाम आणखी कमी दिवसांचा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचल्याने शेतकऱ्यांचे लक्ष आता उर्वरित उसाची तोड, आणि देयकांच्या प्रक्रियेवर आहे.
हेही वाचा: कवलापूर विमानतळाचा मुहूर्त जवळ? केंद्राची टीम पाहणीला, जिल्ह्यात उत्सुकता वाढली.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










