कवलापूर विमानतळाचा मुहूर्त जवळ? केंद्राची टीम पाहणीला, जिल्ह्यात उत्सुकता वाढली

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
कवलापूर विमानतळ प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट; महापौर धीरज सूर्यवंशींसोबत चर्चा. (प्रातिनिधिक/छायाचित्र : Sangli Today)

सांगली : अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या कवलापूर विमानतळ प्रकल्पाबाबत आता प्रत्यक्ष हालचाली सुरू झाल्याने सांगली जिल्ह्यात उत्सुकता वाढली आहे. राज्य सरकारकडून लवकरच प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात येणार असून, तो प्राप्त होताच केंद्र सरकारचे पथक प्रत्यक्ष पाहणीसाठी कवलापूर येथे येणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

विमानतळासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देणे व भूसंपादन प्रक्रिया ही राज्य सरकारची जबाबदारी असून, त्या दृष्टीने जिल्हाधिकारी स्तरावर प्राथमिक हालचाली सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रस्तावानंतर तांत्रिक, भौगोलिक आणि व्यवहार्यता पाहणी केली जाणार आहे.

दरम्यान, अलीकडील विमान दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर देशातील अनियंत्रित एअर स्ट्रीपची माहितीही मागविण्यात आल्याचे मंत्री मोहोळ यांनी सांगितले. बारामतीतील एअर स्ट्रीप ही फ्लाइंग क्लबच्या प्रशिक्षण संस्थेशी संबंधित असून, संबंधित दुर्घटनेचा तपास सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कवलापूर येथे विमानतळ प्रकल्प साकार झाल्यास सांगली-मिरज औद्योगिक क्षेत्राला थेट हवाई जोडणी मिळू शकते. निर्यात, वैद्यकीय सेवा, पर्यटन आणि नव्या उद्योग गुंतवणुकीला या विमानतळामुळे चालना मिळेल, एकूणच सांगली जिल्ह्याच्या आर्थिक विकासासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.

हेही वाचा: पैसे ट्रान्सफर, 30 टन माल गायब; कुपवाड एमआयडीसीतील कंपनीची 19 लाखांची फसवणूक.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा