कुपवाड : कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये मोठी फसवणूक झाल्याचे उघडकीस आले असून कुपवाड एमआयडीसीतील एका कंपनीला तब्बल 19 लाख 9 हजार 122 रुपयांचा फटका बसला आहे. पैसे भरल्यानंतरही मालाचा ट्रक पोहोचला नाही, असा प्रकार समोर आला आहे.
भारत इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर अँड मॅन्युफॅक्चरर्स प्रा. लि. या कंपनीने छत्तीसगडमधील भिलाई येथील अरिहंत सेल्स नेटवर्क या पुरवठादाराकडून सुमारे 30 टन लोखंडी तार (जी.आय. वायर, स्टे वायर व बारबेड वायर) खरेदी केली होती. या मालासाठी 9 मार्च 2025 रोजी पूर्ण रक्कम अदा करण्यात आली होती.
मालाने भरलेला ट्रक (क्र. MH 26 BE 3811) कुपवाड एमआयडीसीकडे रवाना करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र संबंधित ट्रक कुपवाडला पोहोचला नाही. चौकशीदरम्यान हा ट्रक नागपूरजवळील बुटीबोरी परिसरातून परस्पर वळवण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी कंपनीचे व्यवस्थापक संतोष पाटील यांनी कुपवाड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार उत्कर्ष जैन (अरिहंत सेल्स नेटवर्क, भिलाई, छत्तीसगड) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुपवाड एमआयडीसी पोलिसांकडून ट्रक व मालाचा शोध सुरू आहे.
हेही वाचा: 16 फेब्रुवारीपर्यंतच संधी! सांगली पोलिस भरती गुणांकाबाबत हरकत नोंदवण्यासाठी उरले फक्त 2 दिवस.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










