मुंबई/सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): दसरा आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया मजबूत झाल्यामुळे देशभरात सोन्याच्या भावात घसरण नोंदवली गेली आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर सुमारे १ लाख ४७ हजार ४४० रुपयांवर आला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १ लाख ३५ हजार १५० रुपये इतका नोंदवला गेला आहे. १८ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख १० हजार ५८० रुपयांच्या आसपास पोहोचला आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील आजचा सोन्याचा दर (प्रति १० ग्रॅम):
- मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर: २४ कॅरेट – ₹१,४७,४४० | २२ कॅरेट – ₹१,३५,१५० | १८ कॅरेट – ₹१,१०,५८०
- नाशिक, लातूर, वसई-विरार: २४ कॅरेट – ₹१,४७,४७० | २२ कॅरेट – ₹१,३५,१८० | १८ कॅरेट – ₹१,१०,६१०
- जळगाव, नागपूर, अमरावती: २४ कॅरेट – ₹१,४७,४४० | २२ कॅरेट – ₹१,३५,१५० | १८ कॅरेट – ₹१,१०,५८०
टीप: सोन्याच्या दरात शहरानुसार आणि स्थानिक सराफांनुसार थोडाफार फरक असू शकतो.
बाजार विश्लेषकांच्या मते, डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्यामुळे आयात खर्च कमी झाला आहे, ज्यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर घसरले आहेत.




