सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा पंधरवडा’ अंतर्गत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवार (दि. १९) रोजी मोफत हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिरामुळे तब्बल ७५ बालकांना मोफत हृदय शस्त्रक्रियेची संधी मिळणार आहे. या सर्व रुग्णांचे शस्त्रक्रियेसाठी मुंबई येथे जाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन आयुष्मान भारत मिशनचे केंद्रीय अध्यक्ष मा. श्री. ओमप्रकाश शेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्यांनी या उपक्रमामुळे वंचित आणि गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळेल असे सांगितले.
सांगलीतील जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नार्वेकर, वैद्यकीय अधिकारी, विविध प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. या शिबिरामुळे अनेक कुटुंबांना नवसंजीवनी मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
हेही वाचा: जत पंचायत समितीतील तरुण अभियंत्याच्या मृत्यू प्रकरणावरून संताप.