सांगली : हवामान विभागाने सांगली जिल्ह्यासाठी 22 ते 25 सप्टेंबरदरम्यान मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे नदीची पाणीपातळी आधीच वाढलेली असल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ताशी 40 ते 50 किमी वेगाने वाहणारे वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यामुळे नदीकाठावरील गावातील नागरिकांनी विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना नदी व ओढ्यांच्या पात्रात जाणे टाळावे, तसेच आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
पुढील काही दिवस सतर्क राहून सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा: वैयक्तिक टीका किंवा द्वेषपूर्ण वक्तव्ये करणे लोकशाहीला घातक – डॉ. विश्वजित कदम.