Miraj News : कर्नाटकातील व्यापार्‍याचा स्वतःच्याच लुटीचा बनाव; पोलिस तपासात सत्य उघड

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
Miraj Karnataka Trader Fake Robbery Exposed

मिरज : कर्नाटकातील एका धान्य व्यापार्‍याने स्वतःवर हल्ला होऊन 10 लाख रुपयांची लूट झाल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती. या कथित घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. मात्र सखोल चौकशीनंतर पोलिसांनी हा संपूर्ण प्रकार बनाव असल्याचे स्पष्ट केले.

मिरज ते कागवाडदरम्यान प्रवास करताना काही अज्ञातांनी गाडी अडवून चाकूहल्ला करून दहा लाखांची रोकड हिसकावल्याचा आरोप व्यापाऱ्याने केला होता. व्यापाऱ्याच्या तक्रारीनुसार मिरज ग्रामीण तसेच कर्नाटक पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.

मात्र तपासादरम्यान घटनेतील विसंगती पोलिसांच्या लक्षात आल्या. घटनास्थळाची परिस्थिती, कथित हल्लेखोरांची ओळख आणि हल्ल्याची पद्धत या बाबींवर व्यापारी सुसंगत माहिती देऊ शकला नाही. पुढील चौकशीत सत्य उघडकीस आले की हा व्यापारी कर्जबाजारी झाला होता आणि त्यातून सुटका मिळवण्यासाठी त्याने स्वतःच्याच लुटीचा बनाव रचला होता. पोलिसांनी या प्रकरणात कोणतीही वास्तविक लूटमार झाली नसल्याचे निश्चित केले.

हेही वाचा: मिरजेत चालुक्य एक्स्प्रेसमध्ये बनावट नोटांची पिशवी आढळल्याने खळबळ.

TAGGED:
Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा