18 लाखांचे द्राक्षे नेले, 11 लाख बुडवले; बेडगच्या द्राक्ष बागायतदाराची व्यापाऱ्याकडून फसवणूक

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
द्राक्ष व्यवहारातील आर्थिक फसवणुकीचे प्रातिनिधिक छायाचित्र

मिरज : द्राक्ष विक्रीनंतर तब्बल ११ लाख २८ हजार ७५२ रुपये थकवल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील व्यापाऱ्याविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बेडग (ता. मिरज) येथील द्राक्ष बागायतदारासोबत घडली.

दीपक शंकर ओमासे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संबंधित व्यापाऱ्याने त्यांच्या शेतातून १८ लाख ६८ हजार ७५२ रुपयांची द्राक्षे खरेदी केली. व्यवहारानंतर सुरुवातीला ७ लाख ४० हजार रुपये देण्यात आले; मात्र उर्वरित ११ लाखांहून अधिक रक्कम दिली नाही.

रकमेची वारंवार मागणी करूनही टाळाटाळ केल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ओमासे यांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी धनाजी गौतम धायगुडे (रा. मोडनिंब, ता. माढा, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून मिरज ग्रामीण पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सांगली जिल्ह्यात द्राक्ष हंगाम सुरू असताना अशा प्रकारच्या आर्थिक फसवणुकीमुळे शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: सांगली-मिरज रोडने घेतला पुन्हा श्वास; विश्रामबाग परिसरातील 67 अनधिकृत खोकी जमीनदोस्त.

TAGGED:
Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा