सांगली बाजारात निकृष्ट दर्जाचा चायनीज बेदाणा; कारवाईची मागणी

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
फोटो : फाईल फोटो

सांगली : चीनमधून अफगाणिस्तानमार्गे निकृष्ट दर्जाचा बेदाणा मोठ्या प्रमाणात भारतात दाखल झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून, हा बेदाणा सांगली व तासगाव येथील बाजारपेठेतही पोहोचल्याची कबुली बेदाणा व्यापाऱ्यांनी दिली आहे. या बेदाण्याला कृत्रिम रंग देऊन तो भारतीय बेदाण्यात मिसळून बाजारात विक्री करण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

द्राक्ष बागायतदार संघ व बेदाणा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचा पर्दाफाश केला. यानंतर सांगली व तासगाव येथील व्यापाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत निकृष्ट दर्जाचा आयात केलेला बेदाणा बाजारात आणणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी सांगली बाजार समितीचे संचालक प्रशांत मजलेकर, बेदाणा असोसिएशनचे संचालक सुशील हडदरे, मनोज मालू, तासगाव बाजार समितीचे संचालक कुमार शेटे तसेच स्टोअरेज असोसिएशनचे किरण बोडके उपस्थित होते.

पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या ३०–३५ वर्षांत शेतकरी व व्यापाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नांतून बेदाणा उद्योग उभा राहिला आहे. मात्र यंदा उत्पादन कमी असतानाही चीनमधील निकृष्ट बेदाणा मोठ्या प्रमाणात आल्यामुळे दरांवर विपरीत परिणाम झाला आहे. याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

या प्रकरणात आतापर्यंत अनिल बटेजा आणि राहुल बाफना या व्यापाऱ्यांची नावे समोर आली असून, त्यांचे असोसिएशनचे सदस्यत्व रद्द करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच बाजार समितीचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासन व अन्न-औषध प्रशासनाने कोल्ड स्टोअरेजची तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा संपूर्ण बेदाणा बाजार बदनाम होण्याचा धोका असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

हेही वाचा: कुपवाडमध्ये प्रभागनिहाय उमेदवारीवरून राजकीय सस्पेन्स; नावे वगळल्याने बंडखोरीच्या चर्चांना उधाण.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा