Sangli News : चिंतामणराव करंडक 2026 आंतरमहाविद्यालयीन प्रसंगनाट्य स्पर्धेचे आयोजन; 7 फेब्रुवारीला सांगलीत रंगणार रंगत

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
चिंतामणराव व्यापार महाविद्यालय, सांगली | फोटो : अधिकृत संकेतस्थळ, संकलन – Sangli Today

सांगली : चिंतामणराव व्यापार महाविद्यालय, सांगली येथे ‘चिंतामणराव करंडक 2026’ या आंतरमहाविद्यालयीन प्रसंगनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार, 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये पार पडणार आहे.

विद्यार्थ्यांमधील अभिनय कौशल्य, तत्काळ विचारशक्ती आणि रंगमंचीय सादरीकरणाला चालना देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, विविध महाविद्यालयांमधील संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

स्पर्धेत प्रथम पारितोषिक म्हणून फिरता करंडक, सन्मानचिन्ह आणि ₹5,000 रोख रक्कम, द्वितीय पारितोषिक ₹3,000, तर तृतीय पारितोषिक ₹2,000 देण्यात येणार आहे. यासोबतच उत्कृष्ट अभिनेता आणि उत्कृष्ट अभिनेत्री यांना प्रत्येकी ₹1,000, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

प्रत्येक संघात किमान तीन आणि कमाल पाच स्पर्धक असणे बंधनकारक असून, प्रसंग दिल्यानंतर 30 मिनिटांची तयारी वेळ आणि 8+2 मिनिटांचे सादरीकरण अशी स्पर्धेची रचना आहे. सर्व सादरीकरण मराठी भाषेतून करणे आवश्यक आहे. पार्श्वसंगीत किंवा बाह्य साहित्य वापरण्यास मनाई असून, आयोजकांकडून ठराविक प्रॉपर्टी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

प्रवेश शुल्क ₹200 प्रति संघ असून, 31 जानेवारी 2026 पर्यंत ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. स्पर्धेचे लॉट्स 6 फेब्रुवारी रोजी काढण्यात येणार आहेत.

नोंदणी लिंक :

हेही वाचा: रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत सांगलीत भव्य वॉकेथॉन; विविध शाळांमधील शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा