सांगली : मिरज तालुक्यातील हरिपूर येथील प्रसिद्ध व पुरातन बागेतील गणपती मंदिरात आज (गुरुवार, २२ जानेवारी) रोजी गणेश जन्मकाळ उत्सव भक्तिभावात साजरा होत आहे. कृष्णा-वारणा नद्यांच्या संगमाजवळ वसलेल्या या मंदिरात सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळत आहे.
मंदिर परिसर दाट झाडीने वेढलेला असल्याने या देवस्थानाला ‘बागेतील गणपती’ म्हणून ओळखले जाते. धार्मिक श्रद्धेसोबतच हे स्थळ निसर्गरम्य पिकनिक स्पॉट म्हणूनही सांगली जिल्ह्यात लोकप्रिय आहे.
मंदिर प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आज पहाटे पाच वाजल्यापासून अभिषेकास सुरुवात झाली असून सकाळी आठ वाजता आरती पार पडली. सकाळी दहा वाजता ह.भ.प. ओम महाराज यांचे गणेश जन्मकाळ कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. दुपारी १२.०५ वाजता गणेश जन्मकाळ विधी होणार असून त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून गणेश जन्मकाळ उत्सवानिमित्त मंदिरात अभिषेक, भजन, गणेशयाग, संगीत व अभंगवाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सव काळात सांगली, मिरज व आसपासच्या परिसरातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत आहेत.
हेही वाचा: रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत सांगलीत भव्य वॉकेथॉन; विविध शाळांमधील शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










