सांगली : रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने सांगली शहरात रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत भव्य वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले. उप प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), सांगली यांच्या वतीने आयोजित या उपक्रमाला विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या वॉकेथॉनचा शुभारंभ जिल्हा परिषद सांगलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सविता तेजराव नरवाडे (IAS) यांनी हिरवा झेंडा दाखवून केला. शहरातील प्रमुख मार्गांवरून ही शिस्तबद्ध रॅली काढण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी “रस्ता सुरक्षा, जीवन रक्षा” असा संदेश देत नागरिकांमध्ये जनजागृती केली.
वॉकेथॉनमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर, वेगमर्यादा आणि सुरक्षित वाहनचालन याबाबत संदेशफलक हातात घेतले होते. वॉकेथॉनमध्ये शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्याचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला.
प्रशासनाकडून रस्ता सुरक्षेबाबत सातत्याने जनजागृती उपक्रम राबवले जात असून, अशा कार्यक्रमांमुळे मुलांना लहान वयातच वाहतूक नियमांचे महत्त्व समजण्यास मदत होते, असे यावेळी नमूद करण्यात आले. नागरिकांनीही रस्ता सुरक्षेच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले.
हेही वाचा: सांगली जिल्हा बँक दरोडा प्रकरणी चार आरोपी अटकेत; ३.२५ कोटींचा मुद्देमाल जप्त.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










