सांगली : लाथा-बुक्क्या, लोखंडी रॉड व कोयत्याने केलेल्या गंभीर मारहाणीच्या प्रकरणात न्यायालयाने चौघांना दोषी ठरवत तीन वर्षांचा कारावास व दंडाची शिक्षा सुनावली आहे. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी ए. एन. गायकवाड यांनी हा निकाल दिला.
या प्रकरणात सुधीर रघुनाथ पाटील (वय 34), समीर रघुनाथ पाटील (37), विशाल मधुकर गाडे (34) आणि मिथुन बाळासाो भंडारे (37), सर्व रा. आष्टा, यांना दोषी ठरवण्यात आले आहे. न्यायालयाने आरोपींना तीन वर्षांचा कारावास व 27 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
ही घटना 15 एप्रिल 2015 रोजी घडली होती. जखमी नाभिराज आप्पासाहेब रुकडे यांचे कोल्ड्रिंक्सचे गोडाऊन असून त्याठिकाणी सुधीर पाटील कामगार म्हणून कार्यरत होता. कोल्ड्रिंक्सचा एक बॉक्स कमी असल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता. याच वादातून सायंकाळच्या सुमारास आरोपींनी नाभिराज रुकडे यांच्यावर हल्ला केला.
आरोपींनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत लोखंडी रॉड व कोयत्याने हल्ला केल्याने नाभिराज रुकडे गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी त्यांनी आष्टा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
या खटल्यात एकूण पाच साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. साक्षीपुरावे आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे न्यायालयाने चौघांनाही दोषी ठरवले. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील विवेकानंद पाटील यांनी काम पाहिले.
हेही वाचा: आंतरमहाविद्यालयीन प्रसंगनाट्य स्पर्धेचे आयोजन; 7 फेब्रुवारीला सांगलीत रंगणार रंगत.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










