Sangli : ऑनलाईन शेअर मार्केटमधून मोठ्या नफ्याचे आमिष; डॉक्टरला 14 लाखांचा गंडा

Sangli Today Desk
Sangli Today Desk
Sangli Today Desk ही सांगली टुडे न्यूजची संपादकीय टीम आहे. आमची टीम सांगली जिल्ह्यातील सत्यापित बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते — सामाजिक कार्यक्रम, शिक्षण, शेती, आरोग्य, कायदा व...
Doctor Online Share Market Fraud Sangli 14 Lakh

आष्टा : वाळवा येथील एका डॉक्टरला ऑनलाईन शेअर मार्केटमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल 14 लाख 30 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी आष्टा पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. अनिल चंद्रकांत खुंटाळे (वय 52) यांनी मोबाईलवर आलेल्या लिंक आणि संदेशांवर विश्वास ठेवून गुंतवणूक केली होती. सुरुवातीला कमी रक्कम गुंतवल्यानंतर काही परतावा दाखवण्यात आला. त्यामुळे त्यांचा विश्वास बसला. त्यानंतर व्हॉट्सॲप कॉल आणि मेसेजद्वारे त्यांना वारंवार अधिक पैसे गुंतवण्यास प्रवृत्त करण्यात आले.

विविध बँक खात्यांमध्ये त्यांनी एकूण १४ लाख ३० हजार रुपये भरले. मात्र काही दिवसांनी संबंधित कंपनीचा संपर्क क्रमांक व वेबसाईट बंद करण्यात आली. त्यामुळे आपण फसवणुकीला बळी पडलो असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. अखेर त्यांनी आष्टा पोलिस ठाण्यात आपली फसवणूक झाल्याबाबत तक्रार नोंदवली.

या प्रकरणी संबंधित संशयितांवर माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा: MPSC परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी; विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण.

Share This Article
Sangli Today Desk ही सांगली टुडे न्यूजची संपादकीय टीम आहे. आमची टीम सांगली जिल्ह्यातील सत्यापित बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते — सामाजिक कार्यक्रम, शिक्षण, शेती, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था, नागरिक प्रश्न आणि तालुका स्तरावरील घडामोडींवर लक्ष केंद्रित करते. दररोजच्या स्थानिक घटनांचा आढावा घेऊन अचूक व विश्वासार्ह माहिती देणे हेच आमचे ध्येय आहे.