Sangli Accident News | इस्लामपूर : इस्लामपूर बसस्थानक परिसरात झालेल्या कार-दुचाकी अपघातातील जखमी हर्षद बापू सकटे (वय 21, रा. पेठ) याचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्यावर कराड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
हा अपघात मंगळवारी (दि. 17 सप्टेंबर) रात्री झाला होता. अपघातात हर्षदचा मित्र आकाश चंद्रकांत बाबर (वय 27, रा. पेठ) याचा जागीच मृत्यू झाला होता. आकाशचा चुलत भाऊ प्रसाद बाबर याने या घटनेची फिर्याद नोंदवली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास आकाश व हर्षद हे दोघे इस्लामपूर येथे आले होते. प्रसाद बाबर याला भेटून ते मोटरसायकलवरून (एमएच 10 ईपी 6140) पेठकडे परत जात होते. दरम्यान, बसस्थानकाजवळ भरधाव कारने (एमएच 06 एएफ 4247) त्यांना जोराची धडक दिली.
या धडकेत आकाशचा जागीच मृत्यू झाला, तर हर्षद गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी कराड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, 11 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्याचा शनिवारी मृत्यू झाला.
हर्षद हा कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये पदवीच्या पहिल्या वर्षात शिकत होता. त्याच्या पश्चात आई, वडील आणि लहान भाऊ असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पेठ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा: कवठेएकंद येथे शोभेच्या दारूचा स्फोट; आठ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक.