जत तालुक्यातील महिला डॉक्टरचा वरिष्ठांकडून मानसिक छळ; पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
फोटो : फाईल फोटो

माडग्याळ : जत तालुक्यात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यास नकार दिल्याने वरिष्ठ डॉक्टरांकडून मानसिक छळ, आर्थिक दबाव आणि खोट्या कारवाईची भीती दाखवली जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी संबंधित महिला डॉक्टरने मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री तसेच राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

तक्रारदार डॉ. नम्रता तळेकर यांची दीड वर्षांपूर्वी महाराष्ट्र–कर्नाटक सीमेवरील जत तालुक्यातील एका आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. प्रोबेशन कालावधीत त्यांनी एका मृतदेहाचे पोस्टमार्टम करून अहवाल तयार केला होता. मात्र, वरिष्ठ डॉक्टर आणि आरोग्य अधिकाऱ्यांकडून हा रिपोर्ट बदलण्यास सांगण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

डॉ. तळेकर यांनी रिपोर्ट बदलण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर, प्रसूती रजेच्या काळातही त्यांना मानसिक त्रास दिला गेल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. कर्तव्यावर परतल्यानंतर वरिष्ठांकडून पैसे मागितले गेले असून, पैसे न दिल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अडकवण्याची धमकी देण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या सततच्या छळामुळे मानसिक तणाव वाढून अनेक वेळा आत्महत्येचा विचार मनात आल्याचेही त्यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी, दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई, तसेच प्रसूती रजा, वेतनवाढ, पदोन्नती आणि इतर सेवा लाभांची भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, या तक्रारीच्या अनुषंगाने बुधवारी (दि. ३१) बैठक बोलावण्यात आली असून, प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांनी दिली आहे.

हेही वाच : मिरजेत ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली सव्वा कोटींची फसवणूक.

TAGGED:
Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा