सांगली : मिरज तालुक्यातील कर्नाळ गावात गेल्या चार वर्षांपासून दररोज सकाळी ९.१५ वाजता सामुदायिक राष्ट्रगीत गायन केले जाते. या उपक्रमांतर्गत गावातील नागरिक दररोज राष्ट्रगीतासाठी उपस्थित राहून सामुदायिक राष्ट्रगीत गायन करतात.
कर्नाळ ग्रामपंचायत आणि स्थानिक सहकार्याच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू असून, गावात सामाजिक शिस्त आणि एकजुटीची भावना निर्माण होत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येते.
या उपक्रमाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी नुकतीच कर्नाळ गावास भेट दिली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांसोबत राष्ट्रगीत गायनात सहभाग घेतला व या उपक्रमाबाबत माहिती जाणून घेतली.
भेटीदरम्यान ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा व इतर स्थानिक संस्थांच्या कामकाजाचाही आढावा घेण्यात आला. यावेळी सरपंच संध्या कांबळे, उपसरपंच रोहन एडके, ग्रामपंचायत सदस्य, महसूल व पंचायत विभागाचे अधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
हेही वाचा: तीन वर्षांत मोठ्या परताव्याचे आमिष; सांगलीत लाखोंची फसवणूक, दोघांविरोधात गुन्हा दाखल.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










