कवठेमहांकाळ : पंचायत समिती निवडणुकीच्या नामांकन प्रक्रियेत लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला असून, कवठेमहांकाळ तहसील कार्यालयातील एका महसूल सहायकाला २०० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहाथ पकडले आहे.
सुभाष बाबासाहेब पाटील (वय ५४, रा. इरळी, ता. कवठेमहांकाळ) असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून, त्याच्याविरोधात कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार हे त्यांच्या पत्नीच्या नावे पंचायत समिती निवडणुकीसाठी नामांकन फॉर्म घेण्यासाठी तहसील कार्यालयात गेले होते. यावेळी संबंधित कर्मचाऱ्याने प्रत्येक फॉर्मसाठी १०० रुपये देण्याची मागणी केली. दोन नामांकन फॉर्म देण्यासाठी एकूण २०० रुपयांची मागणी करण्यात आल्याची तक्रार ACB कडे दाखल करण्यात आली.
तक्रारीच्या आधारे सांगली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केली. बुधवारी तहसील कार्यालयात पडताळणीदरम्यान तक्रारदाराकडून २०० रुपये स्वीकारताना महसूल सहायकाला रंगेहाथ पकडण्यात आले.
या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. सदर कारवाई ACB पथकाने नियमानुसार राबवली असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा: कुडची–मिरज दरम्यान चालुक्य एक्सप्रेसच्या वेळेबाबत प्रवाशांची तक्रार; रेल्वे प्रशासनाकडून दखल.
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर
- गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी
- भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक फरार
- एनओसीवरून वाद पेटला; सांगलीत वकिलाच्या घरात घुसून धमकी, चौघांवर गुन्हा









