कवठेमहांकाळ तालुक्यातील कुचीतील द्राक्ष उत्पादकांना साडेचौदा लाखांचा फटका; माल नेला, पैसे नाहीत — आंध्र प्रदेशातील व्यापाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची येथील द्राक्षमाल खरेदी व्यवहारात झालेल्या फसवणुकीचे प्रतीकात्मक चित्र.

कवठेमहांकाळ : कुची (ता. कवठेमहांकाळ) येथील तीन द्राक्ष उत्पादकांना तब्बल 14 लाख 49 हजार 231 रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. आंध्र प्रदेशातील व्यापाऱ्यांनी द्राक्षमाल खरेदी करून एका महिन्यात पैसे देण्याचे आश्वासन दिले; मात्र रक्कम न देता टाळाटाळ केल्याने अखेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

कृष्णदेव पंडित डुबोले (रा. कुची) यांनी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रावलपालम (आंध्र प्रदेश) येथील साई फ्रूट कंपनीचे सिरगम रमेश, सिरगम कोंडलराम आणि सिरगम मुरली कृष्णा यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

तिघांनी फिर्यादींसह इतर दोन शेतकऱ्यांकडून एकूण 21 टनांहून अधिक द्राक्षमालाच्या हजारो पेट्या खरेदी करण्यात आल्या. मालाची एकूण किंमत 14.49 लाख रुपये असून “एका महिन्यात पैसे देतो” असे सांगण्यात आले होते. मात्र वारंवार मागणी करूनही पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांनी पोलिसांत धाव घेतली.

दरवर्षी द्राक्ष हंगामात अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना घडत असल्याची चर्चा असून शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे. आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिस पथक आंध्र प्रदेशात रवाना होणार आहे.

हेही वाचा: समृद्ध पंचायतराज अभियानावर सांगली जिल्हा परिषदेची करडी नजर; कामात कसूर करणाऱ्यांना नोटीसचा इशारा.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा