वाळवा तालुक्यात २ किलो गांजा जप्त; कोल्हापूरच्या १८ वर्षीय तरुणास अटक

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
फोटो : प्रातिनिधिक छायाचित्र

ईश्वरपूर : किल्लेमच्छिंद्रगड (ता. वाळवा) येथील गणेश खिंड परिसरात गांजाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एका तरुणाला ईश्वरपूर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत ५४ हजार रुपये किमतीचा सुमारे २ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तेजस संतोष जगताप (वय १८, रा. कसबा बावडा, कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. गणेश खिंड परिसरात गांजाची विक्री होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा रचून संबंधित तरुणास ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्याच्याकडे गांजा आढळून आला.

पोलिस चौकशीत संशयिताने हा गांजा साखराळे (ता. वाळवा) येथील अक्षय महादेव नलवडे याच्याकडून घेतल्याची माहिती दिल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणातील संबंधित संशयित सध्या फरार असून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अटक करण्यात आलेल्या संशयितास न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ईश्वरपूर पोलिस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा: आज जाहीर होणार भाजपची उमेदवारी यादी; पृथ्वीराज पाटील समर्थकांना सुमारे 5 जागा, तर जयश्री पाटील समर्थकांना….

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा