Koyna Dam News | सांगली / सातारा : कोयना धरण प्रशासनाने आज (२७ सप्टेंबर २०२५) सकाळी पाण्याचा विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेतला. सकाळी १० वाजता धरणाचे दोन वक्र दरवाजे प्रत्येकी एक फूट उघडून ३,२०० क्युसेक पाणी सोडण्यात आले. यासोबतच पायथ्यावरील विद्युतगृहातील दोन युनिट्समधून २,१०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. अशा प्रकारे कोयनेतून नदीपात्रात एकूण ५,३०० क्युसेक पाणी सोडले जात आहे.
भारतीय हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी सुरक्षित मर्यादेत ठेवण्यासाठी हा विसर्ग करण्याचा निर्णय घेतल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, नदीकाठच्या ठिकाणी थांबू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे, तर स्थानिक प्रशासनालाही सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, सातारा आणि कोयना परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. परतीच्या पावसाची तीव्रता वाढल्यास विसर्ग आणखी वाढवावा लागेल, अशी शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे..
सांगली जिल्ह्यातील तालुकानिहाय पावसाची नोंद (दि. २७ सप्टेंबर २०२५)
- जत – ४९ मि.मी.
- वाळवा – १३ मि.मी.
- तासगाव – ४५ मि.मी.
- शिराळा – १३ मि.मी.
- आटपाडी – ९ मि.मी.
- कडेगाव – १० मि.मी.
- कवठेमहांकाळ – ७५ मि.मी. 🟡
- पलूस – २५ मि.मी.
- मिरज – ७२ मि.मी. 🟡
- कोकरुड – १२ मि.मी.
- संख – २५ मि.मी.
हेही वाचा: सांगली जिल्ह्यात परतीच्या पावसाचा हाहाकार, शेतकरी चिंतेत.