Sangli News: सांगलीकरांनो लक्ष द्या! कृष्णा नदीवरील नवीन पुलावरून अवजड वाहतुकीला ३० दिवस बंदी; ‘हे’ आहेत पर्यायी मार्ग

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
सांगलीतील कृष्णा नदीवरील नवीन पुलावरून पुढील ३० दिवस अवजड वाहतुकीस बंदी. (प्रातिनिधिक छायाचित्र)

सांगली टुडे वृत्तसेवा: सांगली: शहरातील अंतर्गत वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. सांगली शहरातील कृष्णा नदीवरील ऐतिहासिक आयर्विन पुलाला समांतर असलेल्या (नवीन पुलावरून) होणाऱ्या सर्व अवजड वाहनांच्या वाहतुकीला पुढील ३० दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे. मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम ११५ अन्वये प्राप्त अधिकारानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी याबाबतचे अधिकृत आदेश निर्गमित केले आहेत.

जड वाहनांना बंदी घालण्याचे मुख्य कारण काय?

सांगली शहरातील मध्यवर्ती व गजबजलेल्या भागात शालेय विद्यार्थी, महिला, पादचारी व स्थानिक नागरिकांची दररोज मोठी वर्दळ असते. नवीन पुलावरून शहरात येणाऱ्या जड वाहनांमुळे गंभीर अपघाताची भीती निर्माण झाली होती. शहरातील टिळक चौक, गावभाग, गणपती पेठ आणि सांगली महानगरपालिका चौक परिसरातील  वाहतूक कोंडी कमी करणे आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा तात्पुरता प्रतिबंध घालण्यात आला आहे.

वाहतुकीसाठी कोणता असणार पर्यायी मार्ग?

कृष्णा नदीवरील नवीन पुलावरून जड वाहतूक बंद राहणार असल्याने, प्रशासनाने पर्यायी मार्गाची व्यवस्था केली आहे:

  • सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांनी सांगलीवाडी जुना टोल नाका ➔ नवीन पूल बायपास रोड ➔ शिवशंभो चौक या मार्गाचा वापर करून सांगली शहरात प्रवेश किंवा बाहेर पडावे.

अत्यावश्यक वाहनांना पूर्ण सूट

हा वाहतूक बंदीचा आदेश रुग्णवाहिका (Ambulance), अग्निशामक दलाची वाहने (Fire Brigade) आणि इतर अत्यावश्यक सेवेतील शासकीय वाहनांना लागू राहणार नाही. त्यांची वाहतूक नियमित मार्गानेच सुरू राहील.

१५ दिवसांत हरकती व सूचना नोंदवण्याचे आवाहन

या तात्पुरत्या अधिसूचनेबाबत सांगली शहरातील नागरिक, ट्रान्सपोर्ट असोसिएशन किंवा इतर संबंधित घटकांना काही हरकती अथवा सूचना मांडायच्या असतील, तर त्यांनी हा आदेश प्रसिद्ध झाल्यापासून पुढील १५ दिवसांच्या आत आपले लेखी म्हणणे जिल्हाधिकारी कार्यालय किंवा पोलीस अधीक्षक कार्यालय, सांगली येथे सादर करावे. मुदतीनंतर येणाऱ्या हरकतींचा विचार केला जाणार नसून, त्यानंतर ही अधिसूचना अंतिम केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पाहायला विसरू नका: Diwali 2026: अवघ्या १० हजारांच्या आत ६ सुंदर सोन्याचे कानातले डिझाईन्स.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
चॅनेल फॉलो करा