सांगली टुडे वृत्तसेवा: सांगली/मिरज: दिवाळी सणानिमित्त सुट्टीमध्ये आपल्या मूळ गावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) मिरज आगाराने प्रवाशांसाठी विशेष सोय केली आहे. प्रवाशांचा सणाचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी दि. १ ते २२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत मिरज आगारातून विविध महत्त्वाच्या मार्गांवर ३२ जादा फेऱ्या सुरु करण्यात आल्या आहेत. या जादा बससेवेचा लाभ घेताना सर्वसामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांनी उपलब्ध आगाऊ आरक्षण सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मिरज आगार प्रशासनाने केले आहे.
कोणत्या लांब पल्ल्याच्या मार्गांवर धावणार जादा बसेस?
दिवाळी सणाच्या काळात नोकरदार वर्ग, विद्यार्थी आणि कुटुंबांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मिरज आगारातून खालील प्रमुख मार्गांवर जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत:
- मिरज ते पुणे
- मिरज ते छत्रपती संभाजीनगर
- मिरज ते नाशिक
- मिरज ते नांदेड
- मिरज ते लातूर
- मिरज ते तुळजापूर
पाहायला विसरू नका: Diwali 2026: अवघ्या १० हजारांच्या आत ६ सुंदर सोन्याचे कानातले डिझाईन्स.
कोल्हापूर आणि इचलकरंजी साठीही जादा गाड्यांची सोय
लांब पल्ल्याच्या मार्गांशिवाय स्थानिक व जवळच्या प्रवाशांची दैनंदिन गर्दी टाळण्यासाठी कोल्हापूर आणि इचलकरंजी या मार्गांवरही जादा वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन मिरज आगाराने केले आहे. यामुळे सांगली-कोल्हापूर पट्ट्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.



