Maharashtra Weather News | सांगली : भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेने आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. यामध्ये अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, नाशिक, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे.
हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून ग्रामीण व शहरी भागात पावसामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकतो, असा इशारा दिला आहे. शेतकरी व नागरिकांनी सुरक्षिततेसाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या परिभाषेत यलो अलर्ट म्हणजे मुसळधार पावसाची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहावे. यावेळी नदीकाठच्या भागातील नागरिकांनी काळजी घ्यावी, शहरी भागात पाणी साचू नये यासाठी प्रशासनाने तयारी ठेवावी आणि अनावश्यक प्रवास टाळावा, असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात अधूनमधून जोरदार पाऊस होत असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
हेही वाचा: मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी खासदार विशाल पाटील यांचे मदत संकलन आवाहन.