सांगलीतील या मामांमुळे ‘तारक मेहता फेम भिडे’ ला आली ‘हमारे जमाने कि याद’; शेयर केला व्हिडिओ

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
सांगलीतील रस्त्यावरील खाद्य स्टॉलवर मंदार चांदवडकर | फोटो सौजन्य – Instagram (Video Screenshot)

सांगली : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेते (Mandar Chandwadkar) मंदार चांदवडकर (तारक मेहता फेम आत्माराम भिडे) यांनी सांगली दौऱ्यातील एक साधा पण मनाला भिडणारा क्षण सोशल मीडियावर शेअर केला असून, हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे.

सांगली जिल्ह्यातील बहे गावाजवळील रस्त्यावरील एका छोट्या खाद्यपदार्थ विक्रेत्याजवळ मंदार चांदवडकर थांबले असता, तेथे ५ रुपयांमध्ये मिळणारे चणे, फुटाणे पाहून ते सुखावले. “२०२६ मध्येही ५ रुपयात खाद्यपदार्थ मिळतात,” अशी प्रतिक्रिया देत त्यांनी या क्षणाचे चित्रीकरण केले.

या व्हिडिओत ते एका ८० वर्षीय वृद्ध खाद्यपदार्थ विक्रेत्या मामांशी संवाद साधताना दिसत आहेत. गेली अनेक वर्षे ते हा व्यवसाय करत असल्याचे सांगताना वृद्ध विक्रेत्याचा उत्साह आणि जोश पाहून मंदार चांदवडकर यांनी त्यांचे कौतुक केले. “८० वय असूनही ते अजून एकदम फिट आहेत,” असे म्हणत त्यांनी त्यांचे कौतुक केले.

यानंतर मंदार यांनी ५ रुपयांच्या लेमन गोळीचे पाकिट हातात घेत ‘हमारे जमाने कि यादे’ ताजा केली. “ही आमच्या लहानपणीची लेमन गोळी आहे; तिची चवच वेगळी होती,” अस ते म्हणाले.

(व्हिडिओ सौजन्य – Instagram / @realmandarchandwadkar)

हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर पाहिला जात असून, सांगलीतील साधेपणा, स्वस्त दरातील खाद्य पदार्थ आणि कष्टकरी फेरीवाल्यांचे जीवन यावर अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. स्थानिक व्यावसायिकांबद्दलचा आदर आणि लहान शहरांची संस्कृती अधोरेखित केल्याबद्दल नेटिझन्सकडून मंदार चांदवडकर यांचे कौतुक होत आहे.

हेही वाचा: मतदारांसाठी ‘मताधिकार’ ॲप उपयुक्त; नाव, मतदान केंद्र व उमेदवारांची माहिती एका क्लिकवर.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा