मिरज : तालुक्यातील म्हैसाळ येथे सुरू असलेल्या यात्रेदरम्यान वैरण बाजार परिसरातून पार्क केलेली मोटारसायकल चोरीस गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कागवाड येथील साखर कारखान्यात मशीन ऑपरेटर म्हणून काम करतात. 28 फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे 8.30 वाजता त्यांनी आपल्या बहिणीला म्हैसाळ यात्रेत सोडण्यासाठी मोटारसायकलवरून तेथे येऊन वैरण बाजारजवळ रस्त्याकडेला गाडी पार्क केली होती.
यानंतर रात्री सुमारे 8.45 वाजता ते परत मोटारसायकलजवळ आले असता गाडी लावलेल्या ठिकाणी दिसून आली नाही. परिसरात शोध घेतला तसेच नातेवाईक व मित्रांच्या मदतीने म्हैसाळ आणि आसपासच्या भागात शोधाशोध केली, मात्र मोटारसायकल सापडली नाही.
चोरीस गेलेली मोटारसायकल लाल रंगाची हिरो स्प्लेंडर प्लस (क्रमांक MH-09-DU-2367) असून तिची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
येथे वाचा: Sangli Crime News In Marathi.
हेही वाचा: सांगली जिल्ह्यातील 44 नागरिक आखाती देशांत अडकले ; प्रशासन सतर्क.
- दोन वर्षांपूर्वीच्या वादातून मिरजेत कोयत्याने दुकानाची तोडफोड; सराईत गुन्हेगारास अटक
- म्हैसाळ यात्रेत पार्क केलेली मोटारसायकल चोरी; वैरण बाजार परिसरातील प्रकार
- सांगली जिल्ह्यातील 44 नागरिक आखाती देशांत अडकले ; प्रशासन सतर्क
- सांगलीत 9 मार्चपासून दुचाकी वाहनांसाठी नवी मालिका सुरू
- बैलगाडी शर्यतीला गेलेल्या युवकाची मोटारसायकल चोरी; रेठरेधरण येथील घटना
- दिघंची बसस्थानकाजवळील दुकान फोडले; 1.21 लाखांचा ऐवज लंपास









