मिरज : मिरज शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत अधिकृत प्रवेश केला. मिरजचे आमदार डॉ. सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला.
या वेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व ओम आदिनाथ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब होनमोरे, सौ. अस्मिताताई होनमोरे, सांगली जिल्हा परिषदेतील कृषी समितीचे माजी सभापती राजेंद्र माळी, बेडग ग्रामपंचायत सदस्य विष्णू पाटील यांच्यासह सुरज खाडे, तुकाराम निकम, मोहन पाटील, दिनकर पाटील व अनिकेत पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
या पक्षप्रवेशामुळे मिरज मतदारसंघातील भाजप संघटन अधिक मजबूत होईल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. आमदार सुरेश खाडे यांनी नव्याने पक्षात सहभागी झालेल्या सर्वांचे स्वागत केले.
हेही वाचा: आरफळ कालव्यात बुडून सहा वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; आळसंद गावावर शोककळा.
- वाळवा तालुक्यात भीषण अपघात; पुलावर दुचाकी आदळून युवकाचा मृत्यू, मित्र गंभीर जखमी
- इराण-इस्रायल तणावामुळे तेल दर वाढणार? सांगलीत पेट्रोल 104.07 रुपये; सध्या दरवाढ नाही
- विटा-कराड मार्गावर भीषण अपघात; जखमी महिलेचा 10 दिवसांनी मृत्यू
- सांगली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीची निवड 13 मार्चला; इच्छुकांकडून मोर्चेबांधणी
- सांगलीत कृष्णा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर; ‘हजारो मासे मृत, 5 लाख नागरिकांच्या आरोग्यास धोका’
- कवठेमहांकाळमध्ये 2.88 किलो गांजा जप्त; तस्कर अटकेत









