सांगली : सांगली जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून भारतीय जनता पार्टीकडे इच्छुक उमेदवारांचा मोठा प्रतिसाद दिसून येत आहे. भाजपकडून सुरू करण्यात आलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींच्या पहिल्याच दिवशी तब्बल 564 इच्छुक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.
भाजपकडून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, पहिल्याच दिवशी तासगाव, कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर, शिराळा, कडेगाव आणि पलूस या सात तालुक्यांमधून मोठ्या संख्येने इच्छुकांनी सहभाग नोंदवला.
यामध्ये पंचायत समितीसाठी 340 तर जिल्हा परिषदेसाठी 224 अर्ज प्राप्त झाले असून, एकूण अर्जांची संख्या 564 इतकी आहे. इच्छुक उमेदवारांचा हा प्रतिसाद पाहता भाजपकडून आगामी निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.
या मुलाखती प्रक्रियेदरम्यान भाजप सांगली जिल्हाध्यक्ष सम्राटबाबा महाडीक, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजितभाऊ देशमुख, माजी आमदार पृथ्वीराजबाबा देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संग्रामभाऊ देशमुख, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरदभाऊ लाड, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंदभाऊ देशपांडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख, जिल्हा सरचिटणीस विलास काळेबाग यांच्यासह पक्षाची कोअर कमिटी उपस्थित होती.
भाजपकडून पारदर्शक, शिस्तबद्ध आणि गुणवत्ताधारित निवड प्रक्रिया राबवली जात असून, आगामी निवडणुकांमध्ये नव्या नेतृत्वासह अधिक मजबूतपणे मैदानात उतरण्याचे संकेत यावेळी देण्यात आले.
हेही वाचा: मिरजमध्ये आमदार सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत अनेक मान्यवरांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










