सांगली : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत संघटनात्मक तयारीसह निवडणूक रणनीतीवर चर्चा करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या.
या वेळी उमेदवारांची आजवरची राजकीय व सामाजिक वाटचाल, जनसंपर्क, सामाजिक कार्य तसेच पक्षाशी असलेली निष्ठा या बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. स्थानिक प्रश्नांची जाण, विकासकामांसाठी तत्परता आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा समजून घेणाऱ्या उमेदवारांना संधी देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
महापालिका निवडणुकीप्रमाणेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्येही अनुभवी व कार्यक्षम उमेदवार देण्याचा प्रयत्न राहील, असे स्पष्ट करण्यात आले. समाजहिताला प्राधान्य देणाऱ्या व जनतेमध्ये विश्वास असलेल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याची भूमिका काँग्रेसकडून मांडण्यात आली.
या बैठकीस खासदार विशाल पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, जितेश कदम, अण्णासाहेब कोरे यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा: सांगली–मिरज–कुपवाड महापालिकेत भाजप सर्वाधिक जागांवर विजयी; प्रभागनिहाय विजयी उमेदवारांची यादी.
- बंगळुरू-मुंबई स्लीपर वंदे भारतवरून नवा वाद; सांगली-बेळगावला डावलले जाणार?
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक










