सांगली : मतमोजणीनंतर शहरात हुल्लडबाजी व बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांविरोधात सांगली पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. निष्काळजीपणे दुचाकी चालवणाऱ्या तब्बल 328 दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण 48,200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मतमोजणीनंतर शहरात गोंधळ, वेगात वाहन चालवणे व नियमभंगाच्या तक्रारी वाढल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने ही कारवाई मोहीम राबवली. वाहतूक नियमांचे उल्लंघन, बेदरकार वाहन चालवणे आणि सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या दुचाकीस्वारांना लक्ष्य करून ही कारवाई करण्यात आली.
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुढील काळातही अशाच प्रकारची कडक कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले.
हेही वाचा: मिरज तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक; उमेदवारांच्या मुलाखती सुरु.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










