सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणुकीत मिरज येथील प्रभाग क्रमांक ५ मधून काँग्रेसकडून निवडणूक लढवलेल्या पती-पत्नी संजय मेंढे आणि बबिता मेंढे यांनी मोठा विजय मिळवला आहे. एकाच प्रभागातून पती-पत्नी दोघेही नगरसेवक म्हणून निवडून येण्याची ही दुर्मिळ घटना ठरली आहे.
संजय मेंढे यांनी सुमारे ४ हजार मतांच्या आघाडीने विजय मिळवला, तर बबिता मेंढे यांनी सुमारे ४,५०० मतांच्या आघाडीने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला. या निकालामुळे प्रभाग क्रमांक ५ मधील मतदारांचा काँग्रेसवरील विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
निवडणुकीनंतर प्रतिक्रिया देताना संजय मेंढे यांनी सांगितले की, ही त्यांची पाचवी टर्म असून, नागरिकांनी त्यांच्या कामावर विश्वास ठेवून त्यांना पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल त्यांनी सर्व मतदारांचे आभार मानले.
घराघरांत जाऊन प्रचार, स्थानिक प्रश्नांवर सातत्याने केलेले काम आणि नागरिकांशी थेट संपर्क हेच या पती-पत्नीच्या विजयाचे प्रमुख कारण असल्याचे मेंढे दांपत्याने सांगितले. प्रभागातील नागरिकांनी विकासकामांना संधी दिल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा: मतमोजणीनंतर हुल्लडबाजी; 328 जणांवर सांगलीत दंडात्मक कारवाई.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










