सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेच्या 2026 च्या निवडणुकीत मोठा बदल पाहायला मिळाला असून यंदा एकूण 49 नवे चेहरे नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. विशेष बाब म्हणजे या नव्या चेहऱ्यांमध्ये 34 महिला नगरसेवकांचा समावेश आहे. त्यामुळे महापालिकेतील महिला प्रतिनिधित्वात लक्षणीय वाढ झाली आहे.
यंदाच्या निवडणुकीत प्रथमच निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक 26, काँग्रेसचे 12, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 8 नगरसेवक आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेनेचेही काही नवे चेहरे महापालिकेत दाखल झाले आहेत.
महापालिकेच्या एकूण 78 सदस्यांपैकी तब्बल 49 नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आल्यामुळे यंदाची महापालिका नव्या नेतृत्वासह कार्यरत होणार असल्याचे चित्र आहे. विशेषतः महिलांची संख्या वाढल्याने शहरातील नागरी प्रश्न, सामाजिक विषय आणि स्थानिक विकासकामांमध्ये नव्या दृष्टिकोनाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नव्या नगरसेवकांमध्ये युवक, महिला तसेच विविध सामाजिक पार्श्वभूमीतील प्रतिनिधींचा समावेश असल्याने आगामी काळात महापालिकेच्या कारभारात बदल होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: काँग्रेसकडून एकाच प्रभागातून पती-पत्नी विजयी; दोघांचाही मोठ्या मताधिक्याने विजय.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










