Miraj News : मिरज विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांकडून सोलापूर पूरग्रस्तांना मदत

Sangli Today Desk
Sangli Today Desk
Sangli Today Desk ही सांगली टुडे न्यूजची संपादकीय टीम आहे. आमची टीम सांगली जिल्ह्यातील सत्यापित बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते — सामाजिक कार्यक्रम, शिक्षण, शेती, आरोग्य, कायदा व...
Miraj Constituency Help Solapur Flood Victims 2025 - Sangli Today Photo

Miraj News Today | मिरज : सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी व ढगफुटी सदृश पावसामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली असून हजारो कुटुंबांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतजमिनी, घरे, जनावरे आणि रोजीरोटीची साधने वाहून गेल्याने पूरग्रस्त बांधवांवर मोठे संकट ओढावले आहे.

या कठीण प्रसंगी मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. सुरेश खाडे यांनी सर्व भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांना मदतकार्य राबवण्यासाठी आवाहन केले. या आवाहनाला कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणावर मदत सामग्री जमा केली.

तांदूळ, गहू, आटा, साखर, साबणाच्या वड्या तसेच जनावरांसाठी वैरण (चारा) अशा जीवनावश्यक वस्तूंचे संकलन करून ती सामग्री पूरग्रस्त भागात तातडीने पोहोचवण्यात आली. ही मदत पूरग्रस्त कुटुंबांना दिलासा देणारी ठरली आहे.

डॉ. सुरेश खाडे यांनी म्हटले की, “मिरज विधानसभा कार्यकर्त्यांची समाजाभिमुख वृत्ती आणि तत्परता खरच कौतुकास्पद आहे. या मानवतावादी कार्यात आपला मोलाचा वाटा उचलणाऱ्या सर्व दानशूर नागरिकांचे, कार्यकर्त्यांचे आणि सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे मी मनःपूर्वक आभार मानतो.”

संकटाच्या काळात दाखवलेली ही सामाजिक एकजूट आणि संवेदनशीलता मिरज विधानसभा मतदारसंघासाठी प्रेरणादायी ठरली आहे.

हेही वाचा: झोपलेल्या पत्नीवर नवऱ्याने चाकूने वार करून केली हत्या; परिसरात एकच खळबळ.

Share This Article
Sangli Today Desk ही सांगली टुडे न्यूजची संपादकीय टीम आहे. आमची टीम सांगली जिल्ह्यातील सत्यापित बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते — सामाजिक कार्यक्रम, शिक्षण, शेती, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था, नागरिक प्रश्न आणि तालुका स्तरावरील घडामोडींवर लक्ष केंद्रित करते. दररोजच्या स्थानिक घटनांचा आढावा घेऊन अचूक व विश्वासार्ह माहिती देणे हेच आमचे ध्येय आहे.