मिरज : राज्य सरकारने होमिओपॅथी डॉक्टरांना सीआरएमपी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर केवळ सहा महिन्यांत महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) मध्ये नोंदणी करण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयाविरोधात गुरुवारी मिरज येथील शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी आंदोलन छेडले.
या आंदोलनात असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या माध्यमातून मोठ्या संख्येने डॉक्टर सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान सरकार आणि मेडिकल कौन्सिलच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली.
डॉक्टरांनी आपला विरोध अधिकृतरीत्या नोंदवत उपवैद्यकीय अधीक्षकांना लेखी निवेदन दिले. आंदोलनामुळे रुग्णालयातील अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर विभागांचे कामकाज काही काळासाठी विस्कळीत झाले.
हेही वाचा: सांगलीत आजपासून तीन दिवसांचा फळ महोत्सव; शेतकरी-ग्राहक थेट व्यवहाराची संधी.