मिरज : कर्नाटकातील एका धान्य व्यापार्याने स्वतःवर हल्ला होऊन 10 लाख रुपयांची लूट झाल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती. या कथित घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. मात्र सखोल चौकशीनंतर पोलिसांनी हा संपूर्ण प्रकार बनाव असल्याचे स्पष्ट केले.
मिरज ते कागवाडदरम्यान प्रवास करताना काही अज्ञातांनी गाडी अडवून चाकूहल्ला करून दहा लाखांची रोकड हिसकावल्याचा आरोप व्यापाऱ्याने केला होता. व्यापाऱ्याच्या तक्रारीनुसार मिरज ग्रामीण तसेच कर्नाटक पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
मात्र तपासादरम्यान घटनेतील विसंगती पोलिसांच्या लक्षात आल्या. घटनास्थळाची परिस्थिती, कथित हल्लेखोरांची ओळख आणि हल्ल्याची पद्धत या बाबींवर व्यापारी सुसंगत माहिती देऊ शकला नाही. पुढील चौकशीत सत्य उघडकीस आले की हा व्यापारी कर्जबाजारी झाला होता आणि त्यातून सुटका मिळवण्यासाठी त्याने स्वतःच्याच लुटीचा बनाव रचला होता. पोलिसांनी या प्रकरणात कोणतीही वास्तविक लूटमार झाली नसल्याचे निश्चित केले.
हेही वाचा: मिरजेत चालुक्य एक्स्प्रेसमध्ये बनावट नोटांची पिशवी आढळल्याने खळबळ.