मिरज : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेने प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात धडक मोहीम राबवत मिरजेत ८ व्यावसायिकांवर कारवाई केली. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याकडून एकूण २६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या आदेशानुसार मिरज विभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात ही तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान संबंधित आस्थापनांकडून सुमारे १० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले.
दरम्यान, सांगली-मिरज रस्त्यावर उघड्यावर कचरा टाकणाऱ्या काही व्यावसायिकांवरही १० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
महापालिका प्रशासनाने प्लास्टिक बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा दिला आहे. मिरजनंतर सांगली आणि कुपवाड शहरातही अशाच प्रकारची तपासणी मोहीम राबवली जाणार आहे.
हेही वाचा: सांगली जिल्ह्यात अमली पदार्थांविरुद्ध मोहीम सुरु; सेवन-विक्री केल्यास कठोर कारावासाची तरतूद.
- सांगलीत घरगुती गॅसचा गैरवापर सुरूच? सांगली-मिरज-जतसह ४ ठिकाणी तपासणी
- मिरजेत प्लास्टिकविरोधात महापालिकेची धडक कारवाई; ८ व्यावसायिकांना २६ हजारांचा दंड
- सांगली जिल्ह्यात अमली पदार्थांविरुद्ध मोहीम सुरु; सेवन-विक्री केल्यास कठोर कारावासाची तरतूद
- Sangli Viral Video : सांगली ZP चे CEO विशाल नरवाडे यांचा ‘हेराफेरी’ डान्स व्हायरल; पाहिला का व्हिडिओ?
- कोरडवाहू शेतीला दिलासा; ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेसाठी अर्ज सुरू
- दृष्टी नसली तरी जिद्द मोठी! सांगलीत अंध मुलांचा थरारक क्रिकेट सामना; शिवनेरी संघाचा 7 धावांनी विजय









