Peth Water Crisis : पेठ ग्रामपंचायतीवर ग्रामस्थांचा धडक मोर्चा; महिलांनी रिकाम्या घागरी हातात घेऊन थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठले

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
स्रोत : सम्राट महाडिक | संकलन : Sangli Today

सांगली : वाळवा तालुक्यातील पेठ गावात गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या पाणीटंचाईविरोधात शुक्रवारी (दि. 10) संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा काढला. संतप्त महिलांनी रिकाम्या घागरी हातात घेऊन ग्रामपंचायत कार्यालय गाठले.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावातील पाणी प्रश्नावर सातत्याने आश्वासने देण्यात आली; मात्र प्रत्यक्षात कोणताही ठोस उपाय करण्यात आलेला नाही. “पाण्याचे गाजर दाखवून सत्ता मिळवली, आता जनतेची दिशाभूल थांबवा,” अशा शब्दांत आंदोलकांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली.

बाजारपेठेतून थेट ग्रामपंचायतीपर्यंत मोर्चा

पेठ गावातील बाजारपेठेतून निघालेला हा मोर्चा ग्रामपंचायत कार्यालयावर पोहोचला. यावेळी ग्रामस्थांनी सरपंच व सत्ताधारी पदाधिकाऱ्यांना जाब विचारत पाणी प्रश्नावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. महिलांनी आघाडी घेत या आंदोलनात सहभाग घेतल्याने मोर्चाने विशेष लक्ष वेधले.

स्थानिक नेते व ग्रामस्थांची उपस्थिती

या आंदोलनाला स्थानिक नेते सम्राट महाडिक, माजी जिल्हा परिषद सभापती जगन्नाथ माळी, रामोशी समाजाचे नेते मोहन मदने, माजी सरपंच मीनाक्षीताई महाडीक, व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेच्या संचालिका तेजस्वीताई महाडीक यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच माजी उपसरपंच शंकर पाटील, भारती कांबळे, वसुधा दाभोळे, राधाताई हवलदार, अमृता भोसले, अल्फिया ढगे, साक्षी हराळे, शोभा शिणगारे, नीताताई भोसले, प्रशांत कदम यांच्यासह राहुल पाटील, विकास दाभोळे, आसिफ जकाते, आमीर ढगे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.

“प्रश्न सुटला नाही तर आंदोलन तीव्र करू”

पाणी प्रश्नावर लवकरात लवकर ठोस निर्णय न झाल्यास येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिला.

दरम्यान, या प्रकरणावर ग्रामपंचायत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.

हेही वाचा: २५ लाखांच्या सावकारी वसुलीसाठी घरात घुसून दमदाटी; महिलेचा विनयभंग, खासगी सावकारावर गुन्हा दाखल.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा