शिराळा : सागावजवळील चिखली स्मशानभूमी परिसरात दुचाकीला चारचाकीने दिलेल्या धडकेत 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
दिलीप कुमार देविलाल माळी (वय 18, रा. राजस्थान, सध्या सागाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 24 मार्च रोजी रात्री सुमारे 9.15 वाजण्याच्या सुमारास संबंधित तरुण दुचाकीनत पेट्रोल भरण्यासाठी गेला होता. परत येताना चिखली स्मशानभूमीजवळ समोरून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या वॅगनार कारने जोरदार धडक दिली.
या अपघातात तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. स्थानिकांच्या मदतीने त्याला तातडीने शिराळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी संबंधित अज्ञात चारचाकी चालकाविरुद्ध शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
- शिराळा : सागावजवळ भीषण अपघात; 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- कुपवाड एमआयडीसी मध्ये पिस्तूल, जिवंत काडतुसे व धारदार शस्त्रांसह तिघांना ताब्यात; शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन, गुन्हा दाखल
- संसदेत गॅस वितरणाचा मुद्दा; सांगलीचे खासदार विशाल पाटील यांचा सवाल
- ईश्वरपूर-सांगली रोडवर अपघात; दुचाकीस्वार दाम्पत्य जखमी, वॅगनआर चालक फरार
- शिरढोणजवळ भीषण अपघात; कोल्हापूरच्या दांपत्याचा जागीच मृत्यू
- पासपोर्टसाठी जाणाऱ्यांनी लक्ष द्या; पुण्यातील केंद्र 30 मार्चपासून नव्या ठिकाणी










