Sangli Accident News : फार्णेवाडीजवळ दुचाकीची दगडांच्या ढिगाला धडक; ‘हुतात्मा’चे माजी संचालक जयकर चव्हाण यांचा जागीच मृत्यू

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
रस्त्यातील दगडांच्या ढिगाला दुचाकी धडकल्याने ‘हुतात्मा’चे माजी संचालक जयकर चव्हाण यांचा अपघाती मृत्यू. | प्रातिनिधिक छायाचित्र - Sangli Today

Sangli Today | ईश्वरपूर : पुसेसावळी–वाकुर्डे बुद्रुक रस्त्यावर सुरू असलेल्या कामादरम्यान रस्त्यात टाकलेल्या दगडांच्या ढिगाला दुचाकी धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात हुतात्मा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक जयवंतराव ऊर्फ जयकर यशवंतराव चव्हाण (वय 56, रा. नवेखेड) यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना शुक्रवारी रात्री फार्णेवाडी–बोरगावदरम्यान घडली.

पुसेसावळी ते वाकुर्डे बुद्रुक या मार्गावर रस्त्याचे काम सुरू असून बहे हायस्कूल ते फार्णेवाडी या टप्प्यातील बहुतांश काम पूर्ण झाले आहे. मात्र फार्णेवाडीनजीक जमदाडे वस्ती परिसरात दगडी पिचिंगसाठी मोठ्या प्रमाणात दगड रस्त्यावर टाकण्यात आले आहेत. या दगडांमुळे रस्त्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

शुक्रवारी रात्री सुमारे साडेनऊच्या सुमारास जयकर चव्हाण हे आपल्या दुचाकीवरून (MH 10 A 1800) बहे हायस्कूलकडून नवेखेडच्या दिशेने जात असताना रस्त्यातील दगडांच्या ढिगाला त्यांची दुचाकी धडकली. अपघातात त्यांचे डोके जोरात रस्त्यावर आदळल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

जयकर चव्हाण हे नवेखेड सर्वसेवा सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष होते. याशिवाय त्यांनी हुतात्मा सहकारी साखर कारखाना तसेच हुतात्मा सहकारी दूध संघामध्ये माजी संचालक म्हणूनही काम पाहिले होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ईश्वरपूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे, रस्त्यावर सुरक्षेच्या उपाययोजना का करण्यात आल्या नव्हत्या असा प्रश्न नागरिक करत आहेत.

हेही वाचा: मिरजेत शस्त्रविक्रीसाठी आलेल्यास अटक; निवडणूक पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा