सांगली : सांगली शहरातील अहिल्यानगर परिसरात पूर्व वैमनस्यातून एका तरुणाची कोयत्याने हत्या झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. विनायक ऊर्फ राहुल कदम (रा. सांगली) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत राहुल कदम आणि संशयित आरोपी यांच्यात सुमारे आठ दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून शुक्रवारी दुपारी संशयितांनी राहुलवर हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
शुक्रवारी दुपारी राहुल कदम अहिल्यानगर परिसरातील महावितरण कार्यालयासमोर थांबलेला असताना चार संशयित तेथे आले. जुन्या वादाचा जाब विचारत त्यांनी अचानक कोयत्याने हल्ला चढवला. डोक्यावर व चेहऱ्यावर वर्मी घाव बसल्याने राहुल गंभीर जखमी झाला.
हल्ल्यानंतर स्थानिकांनी त्याला तातडीने सांगलीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच सायंकाळी त्याचा मृत्यू झाला, असे डॉक्टरांनी घोषित केले.
घटनेनंतर चारही संशयित आरोपी स्वतःहून संजयनगर पोलीस ठाण्यात हजर झाले. पूर्व वैमनस्यातूनच हा खून झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला असून, पुढील तपास सुरू आहे. कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक आनंद घाटगे यांनी दिली.
हेही वाचा: मेंदूमृत रुग्णाच्या अवयवदानातून तिघांना जीवनदान; हरिपूरचे दीपक धर्माधिकारी मृत्यूनंतरही अवयवरूपी जिवंत.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










