Sangli Air Quality Alert: सांगलीत श्वास घेणे म्हणजे दररोज 2.4 सिगारेट ओढण्याइतका धोका

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
Sangli Air Quality Index Poor Health AlAlert (प्रातिनिधिक छायाचित्र)

Sangli News | सांगली : दिल्लीमध्ये वाढत्या वायू प्रदूषणामुळे तंदूर, कोळसा आणि लाकूड वापरणाऱ्या भट्ट्यांवर बंदी घालण्यात आली असतानाच, सांगली शहरातील हवेची गुणवत्ता देखील चिंताजनक पातळीवर पोहोचल्याचे चित्र समोर आले आहे. मंगळवारी दुपारी उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार सांगलीचा Air Quality Index (AQI) 129 इतका नोंदवला गेला असून ही पातळी ‘Poor’ (आरोग्यास घातक) श्रेणीत मोडते.

हवा गुणवत्ता मोजणाऱ्या AQI.in या सार्वजनिक उपलब्ध प्लॅटफॉर्मवरील माहितीनुसार सांगलीतील PM2.5 कणांचे प्रमाण 47 µg/m³, तर PM10 कण 86 µg/m³ इतके नोंदवण्यात आले आहे. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, अशा प्रदूषित हवेत सातत्याने श्वास घेणे म्हणजे शरीरावर दररोज सुमारे 2.4 सिगारेट ओढण्याइतका परिणाम होऊ शकतो.

शहरातील काही भागांत स्थिती अधिक गंभीर

सांगलीतील कोठावळे गल्ली–खणभाग परिसरात AQI 122 इतका नोंदवण्यात आला असून, हा भागही ‘Poor’ श्रेणीत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील AQI सातत्याने 120 ते 150 दरम्यान राहात असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

आरोग्यावर होणारे परिणाम

तज्ज्ञांच्या मते या प्रदूषणाचा सर्वाधिक फटका दम्याचे रुग्ण, लहान मुले, वृद्ध नागरिक आणि हृदयरोगी व्यक्तींना बसू शकतो. सतत खोकला, श्वास घेण्यास त्रास, छातीत जडपणा, डोळ्यांची जळजळ तसेच अ‍ॅलर्जीची लक्षणे वाढण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

दिल्लीमध्ये बंदी, सांगलीत काय?

दिल्ली सरकारने वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर कोळसा व लाकूड वापरणाऱ्या तंदूर भट्ट्यांवर बंदी घातली आहे. मात्र सांगली–मिरज–कुपवाड महापालिका क्षेत्रात अद्याप कोणतीही ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांकडून “दिल्लीसारखी परिस्थिती उद्भवण्याआधीच सांगलीत उपाययोजना का होत नाहीत?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सांगलीत वाढत चाललेले वायू प्रदूषण हे आता केवळ पर्यावरणाचा नव्हे, तर थेट सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न बनत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

हेही वाचा: सांगली महापालिकेसाठी महाविकास आघाडी एकत्र, महायुतीही संयुक्त लढतीच्या तयारीत.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा