मिरज | आरग (ता. मिरज) येथे बचत गटातील महिलांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत घरगुती व्यवसायाच्या नावाखाली सुमारे 9 लाख रुपयांचे कर्ज घेऊन महिला कुटुंबासह फरार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविता राजकुमार चौगुले (रा. स्टेशन रोड, आरग) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, वंदना प्रताप कवाळे, तिचा पती प्रताप आप्पासाहेब कवाळे, तसेच ओंकार प्रताप कवाळे आणि आदित्य प्रताप कवाळे (सर्व रा. आरग, ता. मिरज) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरगुती व्यवसायाच्या नावाखाली कर्ज उचलले
तक्रारीतील माहितीनुसार, वंदना कवाळे ही परिसरात बचत गट चालवत होती. तिने दुसऱ्या बचत गटातील अध्यक्ष मीनाक्षी कोळी, सविता चौगुले आणि इतर महिलांचा विश्वास संपादन केला. यानंतर घरगुती व्यवसाय सुरू करण्याच्या नावाखाली बचत गटातील महिलांच्या नावावर बँकेतून पावणे नऊ लाख रुपयांचे कर्ज घेतले.
कर्जाची रक्कम दीड वर्षात परतफेड करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात कर्जाचे हप्ते भरले गेले नाहीत, तसेच घेतलेली रक्कमही महिलांना परत देण्यात आली नाही.
कर्जफेडीचा तगादा लागताच घर सोडून पलायन
बचत गटातील महिलांनी वारंवार कर्जफेडीचा तगादा लावल्यानंतर 18 मे रोजी वंदना कवाळे हिने पती आणि दोन मुलांसह घर सोडून पलायन केल्याची माहिती समोर आली. यामुळे सविता चौगुले यांच्यासह 10 ते 12 महिलांची आर्थिक फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पलायन केलेल्या आरोपींचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










