सांगली : जिल्ह्यातील बोगस वैद्यकीय व्यावसायिकांना आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची बैठक जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत अवैध वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध प्रतिबंधात्मक व कायदेशीर कारवाई अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, पोलीस विभागाचे प्रतिनिधी तसेच तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते. ग्रामीण भागात बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहिम राबवावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले.
बैठकीत जिल्ह्यात अवैधरीत्या सुरू असलेल्या लॅबोरेटरींचे सर्वेक्षण करून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच परवानगीशिवाय आयुर्वेदिक, होमिओपॅथिक उपचार करणाऱ्या व्यक्ती, तसेच अनधिकृत डेंटल लॅब चालविणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर पावले उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यासोबतच नागरिकांमध्ये जनजागृती वाढवण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करून बोगस वैद्यकीय व्यवसायाबाबत जनजागृती करण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या. बैठकीत आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीचा आढावाही सादर करण्यात आला.
आरोग्य सेवा ही नागरिकांच्या जीवाशी संबंधित बाब असल्याने, या विषयात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी भूमिका बैठकीत स्पष्ट करण्यात आली.
हेही वाचा: CDS पूर्वप्रशिक्षणासाठी 15 जानेवारीला सांगलीत मुलाखती.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










